preloader

पीसीओंडी : महिलांमध्ये आढळून येणारा आजार

पीसीओंडी : महिलांमध्ये आढळून येणारा आजार
  • February 04, 2021

बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल महिलांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या दिसून येतात. मुख्यतः पाळी अनियमित असणे,वजन वाढणे, चेहऱ्यावर येणारे मुरूम या सर्व लक्षणांनी पॉलिसिस्टीक ओव्हरीयन डिसीज म्हणजे पीसीओडीचे सर्वाधिक रुग्णआढळतात. वय १६ ते ३0 च्या दरम्या ६०% मुलींमध्ये पी.सी.ओ.डी. हा आजार दिसून येतो. याचा महिलांमध्ये पाळीवर सरळ सरळ परिणाम होत असल्याने या स्त्रीरोगाची गंभीरपणे दखल घेतली जाते.

'पीसीओडी म्हणजे काय?
दर महिन्याला पाळी आल्यावर बीजाशयामध्ये स्त्रीबीजाची वाढ होण्यास सुरुवात होते. पाळीच्या १२ व्या ते १४ व्यादिवसादरम्यान हे पूर्ण वाढ झालेले स्त्रीबीज बीजाशयातून निघून गर्भाशय नलिकेत येते. पीसीओडी या आजारामध्ये हे स्त्रीबीज परिपक्क न होता तसेच अपूर्ण वाढीमध्ये बीजाशयात राहते. असे हे स्त्रीबीज गाठीच्या स्वरूपात दिसत असल्याने याला पॉलिसिस्टीक डिसीज म्हणतात. एका शारीरिक कार्यात अडथळा आल्याने त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ लागतो.अशाने हार्मोनल असंतुलनाला सामोरे जावे लागते आणि किशोरवयीन मुलींपासून ते मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीपर्यंत यामुळे विविध शारीरिक समस्या उद्‌भवतात. अनेक मुली या आजारावर वेळीच उपचार करत नसल्याने त्यामुळे त्यांना भविष्यातवंध्यत्वाला सामोरे जावू लागू शकते. 'पीसीओडीचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी व हार्मोनल (रक्ताच्या) तपासण्या केल्या जातात.

'पीसीओडीची लक्षणे :
१) अचानक वजन वाढू लागतो 
२) अनियमित मासिक पाळी 
३) मासिक पाळी सुरू असताना असह्य वेदना होणे 
४) डोकेदुखी
५) केस गळणे 
६) चेहऱ्यावर डाग व पिंपल्स 
७) चेहऱ्यावर लव येणे 
८) मानेवर काळेपणा येणे 
९) हात-पाय व पोटावरील लव वाढणे.


'पीसीओडीची कारणे :-
१) चुकीची जीवनशैली 
२) चुकीचा आहार 
३) अनुवंशिकता 
४) व्यायामाची कमतरता

'पीसीओडी पासून दूर राहण्यासाठी खालील उपाय करा.
१) नियमित व्यायाम व योगासने करणे 
२) संतुलीत आहार घेणे 
३) मद्यपान व धुम्रपान टाळा.

'पीसीओडी समस्या ही आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेली समस्या आहे. त्यामुळे वेळीच योग्य उपचार करूनआपल्या स्त्रीरोग तज्ञांना भेटून तुम्ही या समस्येवर उपचार करू शकता.

डॉ. उमेश मरठे,
(लॅप्रोस्कोपी सर्जन व वंध्यत्व तज्ञ)
 

Seeds IVF & Fertility Care Centre : Best IVF Treatment Specialist Doctors For Men & Women in Nashik, mumbai, pune, kalyan, dhule, jalgaon, ahmednagar