preloader

पुरुषाचे शुक्राणूंचे विकार व वंधत्व

पुरुषाचे शुक्राणूंचे विकार व वंधत्व
  • March 04, 2021

मूल न होणे याकरिता जसे स्त्रियांमध्ये काही दोष असतात त्यानुसार पुरुषनमध्येसुद्धा काही दोष असू शकतात. सामान्यतः पुरुशामध्ये वीर्यदोष व शुक्राणूंच्या दोषमुळे गर्भधारणेस अडचण निर्माण होते. वंधत्व असलेल्या जोडप्यांमध्ये पुरुष वंध्यत्वाचे प्रमाण ३० टक्के आढळतात. जेव्हा साधारणपणे एक वर्षा पर्यंत नैसर्गिक संबंध होऊनही वंधत्वतज्ञ* कडे जाऊन तपासणी केली पाहिजे. 

पुरुषांमध्ये नैसर्गिक संबंधाच्या वेळी पूर्नत्वच्या आधी वीर्यस्खलन होणे अथवा वीर्याचे प्रमाण अत्यल्प असणे हे वीर्यदोष आहेत. वीर्यातील शुक्राणूंचे प्रमाण कमी असणे, शुक्राणूंची चपळता व विकृत आकार हे शुक्राणूंचे दोष आहेत. याशिवाय कधी कधी शुक्राणूं मध्ये विरिया सोबत जंतू प्रादुर्भाव (Infection) ही आढळते. उच्च रक्तदाब, मधुमेह  यांच्यासारख्या आजारांमध्येसुद्धा वीर्यदोष व शुक्राणूंचा विकार आढळतात. 

पुरुषांमध्ये शुक्राणूंची तपासणी करणे ही अतिशय सुलभ प्रक्रिया आहे. वीर्यस्खलनाच्या दोन ते तीन दिवसानंतर वीर्य लॅबमध्ये दिले जाऊन त्याच्या विविध तपासण्या करता येतात. वीर्य तपासणी तज्ञ कडून केल्यावर त्यातील विकार आणि आजार जाजता येतात व त्यानुसार त्याची चिकित्सा केली जाते. 

आता पूर्वीपेक्षा मुबलक प्रमाणात औषधे उपलब्ध आहेत. नवीन नवीन संशोधनाद्वारे वेगवेगळ्या विकारांचे उपचार संभव आहेत. औषधोपचाराने शुक्राणूंची प्रत वाढवता येते. उत्तम गुणवत्तेचे शुक्राणू  असतील तर निर्माण होणार गर्भ चांगल्या प्रतीचा असतो, अन्यथा कधी कधी गर्भपात होऊ शकतो. 

शुक्राणूंच्या समस्यांनुसार आता चिकित्सा उपलब्ध आहेत. शुक्राणूंची चपळता कमी असेल तर IUI (इंट्रा युटेराइन इनसेमिनेशन) ध्यारा गर्भधारणा होऊ शकते तर IVF म्हणजेच टेस्टट्यूब बेबी करूनसुद्धा गर्भधारणा राहू राहते. शुक्राणूंची वाढ पूर्ण न होत असल्यास अथवा शुक्रवाहिनींमध्ये अवरोध असल्यास TESA - Testicular sperm aspiration,  PESA - ercutoneous sperm aspiration, FESE - Festicular sperm aspiration, Micro Desection Tese इत्यादी प्रक्रियाने शुक्राणूंची प्राप्ती होऊ शकते. 

म्हणून ज्या पुरुषांमध्ये काही आजार किंवा विकार आहेत त्यांनी निराश न होता वंध्यत्वतज्ज्ञच्या त्यास अपत्यप्राप्ती होऊ शकते. 

शुक्राणूंची प्रत वाढवण्यासाठी उपाय  :
धूम्रपान आणि मध्यपान वर्ज करणे. 
उष्ण पानाने स्नान टाळणे.
औद्योगिक टॉक्सीनचा संपर्क टाळणे. 
अतिघट्ट कपडे टाळणे. 
नियमित व्यायाम करणे. 
संपूर्ण आहार प्रथिने, सिंग्ध पधार्धचे सेवन करणे. 
ताणतणाव विरहित जीवनशैली असावी.

डॉ. उमेश मरठे,
(लॅप्रोस्कोपी सर्जन व वंध्यत्व तज्ञ)