वंधत्व : वारंवार होणारे गर्भपात

वंधत्व : वारंवार होणारे गर्भपात
  • March 18, 2021

गर्भधारणा होऊन जर तीन महिन्याच्या आत गर्भपात होत असेल, तर ही स्थिती  सेकंडरी इंफेर्टीलिटी म्हणज द्वितीय वंधत्व म्हणून ओळखली जाते. साधारणपणे सहा ते नवव्या गर्भधारणेच्या आठवड्यांदरम्यान तीनपेक्षा जास्त वेळा गर्भपात झाले असतील, तर त्याची करणे अत्यंगात असतात. 

वारंवार होणाऱ्या गर्भपाताची कारणे पुढीप्रमाणे :
A)  गर्भाशयाच्या रचनात्मक विकृती 
१. गर्भाशयात पडदा असणे. 
२. दोन गर्भाशय असणे. 
३. मुलेरिअन विकृती. 
४. एकाच गर्भनलिका असणे.
५. गर्भाशय छोटे असणे. 
६. गर्भाशयामध्ये कोंब किंवा गाठी असणे. 
७. गर्भाशयमुख मोठे असणे. 

B)  प्रतिकारशमता कमी असणे 
१. गर्भ हा वेगवेगळ्या पेश्यापासून बनल्याने गर्भाशयाध्वारे त्याचा प्रतिकार केला जातो (Allomune Failure)
२. गर्भधारणेत रक्त संमप्रहणाची क्षमता वाचलेली असते (Hyper coaglulation) 
३. रक्तस्रावजन्य विकार (Hrombophilla)

C) जनुकीय गुणसूत्राचे विकार 
१. विकृती स्त्रीबीज अथवा पुरुषबीज निर्मिती. 
२. विकृत गर्भनिर्मिती. 

D) संप्रेरकांचा अभाव 
१. प्रोलेस्ट्रोरानची कमी 
२.  प्रोलेस्ट्रोरानचे वाढलेलं प्रमाण 
३. थायरॉईडचे वाढलेलं प्रमाण 
४. संप्रेरकांचा असमतोल 
५. मधुमेह, पीसीओडीचे आजार  

E) एंडोमेट्रिओसिस (endometriosis)

F) गर्भाशयाचे जंतुसंसर्ग 
१. टॉर्च (TORCH) Infection
२. योनिमार्गासागे विकार 

G) मानसिक आजार 

या सर्व कारणांमुळे वारंवार गर्भपात होतात. ज्या जोडप्यांमध्ये असे वारंवार गर्भपात होतात, त्यानी वंधत्व तज्ज्ञकडे जाऊन समूळ उपचार करून घ्यावेत. 
अश्याप्रकारची जोडपी जेव्हा आमच्याकडे वंधत्व निवारणासाठी येतात, तेव्हा त्याची सखोल माहिती घेतली जाते. पती व पत्नी दोघानचेही हार्मोनल तपासनीसोबत काही विशेष जनुकीय तपासण्या केल्या जातात. वारंवार होणाऱ्या गर्भपाताचे कारण शोधले जाते. त्या कारणांनुसार स्त्रीयांची चिकित्सा केली जाते. 

3D सोनोग्राफीद्वारे गर्भाशयाच्या विकृतीचे निदान करणे सुलभ आहे. याशिवाय HSG विका लॅप्रोस्कोपी व हिस्ट्रोस्कोपी गर्भाशयाच्या विकृतीचे निदान व चिकित्सा केली जाते. लॅप्रोस्कोपी शास्त्रकिरयेद्वारे गर्भाशयाच्या विकृतीची चिकित्सा केल्यावर गर्भधारणेस अडसर निर्माण होत नाही. हार्मोनल सपोर्ट आणि अत्याधुनिक औषधनद्वारे गर्भ वाढीस मदत होते. 

जनुकीय दोषनिवार IVF म्हणजे टेस्टटूब बेबी या प्रकाराने उपचार समभाव आहे. सदोष बीज अथवा सदोष शुक्राणूनऐवजी चांगले बीज वापरल्याने वारंवार होणारे गर्भपात टाळता येतात.  


डॉ. उमेश मरठे,
(लॅप्रोस्कोपी सर्जन व वंध्यत्व तज्ञ)