बाळ हवंय ! चला शोधू या वंध्यत्वाची कारणे; अत्याधुनिक उपचार शक्‍य

बाळ हवंय ! चला शोधू या वंध्यत्वाची कारणे; अत्याधुनिक उपचार शक्‍य
  • February 18, 2021

मूल न होण्याच्या अवस्थेला वंध्यत्व असे म्हणतात.ज्या स्त्रीला एकदाही दिवस गेले नाहीत त्या वंध्यत्वाच्या प्रकाराला प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणतात.  ज्या स्त्रीला एकदा मूळ झाले असताना, पुन्हा दिवस राहत नसतील तर त्या वंध्यत्वाच्या प्रकाराला सेकंड एन्फर्टिलिटी असे म्हणतात.स्त्री आणि पुरुष यांच्यात लैंगिक संबंधातून गर्भाची निर्मिती होते. हाच  गर्भ स्त्रीच्या ग्भाशयात रुजतो, वाढतोव नऊ  महिन्यांनंतर बाळाचा जन्म होतो. या अगदी जैसर्गिक क्रियेमध्ये कोठेतरी अडथळा अथवा विकारअसल्यास किंवा उत्पन्न झाल्यास गर्भधारणा होत नाही.सर्वसाधारणपणे १० टक्के जोडप्यांमध्ये  ही समस्या असत.
पुरुष व स्त्री : दोघांची संपूर्ण वैद्यकीय व  लैगिक माहिती व  शारीरिक तपासणी,लॅबोरेटरी तपासण्या करवी लागते. स्त्री  - गर्भाशय गर्भनलिका व  स्तीबीजकोश यांच्या तपासण्या (Evaluation of Uterus, Tubes, Ovarien Peritonial Factors),व्हजायनल सोनोग्राफी (Vaginal Sonography)   गर्घाशय स्त्रीबीजकोष व स्त्री बिजाच्या वाढीसंबन्धी तपासणी विडिओ हिस्ट्रोस्कोपी (Video Laparoscopy), गर्भाशय, गर्भनलिका, स्त्रीबीजकोष, कोष  इतर अकयवांचौ तपासणी.पुरूष - वीर्यतपाशणी, सोनोद्याफी,डॉपलर तपासणी, रक्तातील हार्मोन्म तपासणी, पुरषबीजकोणाच्या तुकड्याची तपासणी HSaUo आवश्यक)

IUI  म्हणजे काय?
यात गर्चपिशवीच्या आत वीर्य Canula ने सोडले जाते.स्त्रीला पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून गोळ्या किंवा इंजेकशन देऊन अंडाशयात अंडी तयार करतात; त्याची फॉलीक्युलरस्टडी करून IUI  केले जाते. पतीच्या शुक्राणूंची संख्या कमीअसल्यास  या पद्धतीमुळे फयदा  होउन गर्भधारणा होण्याचीशकयता वाढते.

देस्ट टयूब बेबी (IVF) म्हणजे काय ?
टेस्ट ट्यूब  बेबीमध्ये स्त्रीला पाळीच्या गोळ्या दिल्या जातात. पाळीच्या २० व्या दिवसापासून इंजेकशन सुरु होतात. जी रोज २० ते २५ दिवस घ्यावी लागतात. मध्ये एक पाळी येते व दुसऱ्या दिवसापासून रे बीजकोशात स्त्रीबीज तयार होण्यासाठी इंजेक्शन सुरू होतात. पाळीच्या नवव्या दिवसापासून फॉलीक्युलर स्टडी करून स्त्री बीजकोशातील फॉलोक्युल्सची वाढ १८ मि.मी .पेक्षा जास्त झाल्यावर इंजेकशन देऊन ३६ तासांनी तयार झालेले स्त्रीबीज स्त्री बीजकोषातून सोनोग्राफीने सुईने बाहेर काढतात. स्त्रीबीज व पुरुषबीज  यांचे IVF लॅबमध्ये मिलन घडवून आणले जाते व तयार झालेला गर्भ तीन दिवसांनंतर गर्भाशयात सोडला जातो.नऊ  महिने त्याची वाढ होते ब नंतर बाळ जन्माला येते.

- डॉ. उमेश मराठे,
(लॅप्रोस्कोपी सर्जन व वंध्यत्व तज्ञ)