वंधत्व

वंधत्व
  • January 28, 2021

स्त्रियांमध्ये असणाऱ्या मातृत्वाची जाण हि तिच्या मातृत्वाशी संबंधित आहे त्यानंतर सर्वजण तिच्याकडे मातृत्वाच्या अपेक्षेने बघत असल्यनाने एखाद्या जोडप्याला मुल न होणे ही गंभीर समस्या आहे. आपल्या समाजात बदलत्या जीवनशैलीमुळे आणि विविध आरोग्यच्या समस्यांमुळे वंधत्व ही मोठी समस्या होत चालली आहे. 

स्त्रीयांमध्ये असणाऱ्या मातृत्वाची जाण हि तिच्या मातृत्वाशी संबंधित आहे त्यानंतर सर्वजण तिच्याकडे मातृत्वाच्या अपेक्षेने बघत असल्यनाने एखाद्या जोडप्याला मुल न होणे ही गंभीर समस्या आहे. आपल्या समाजात बदलत्या जीवनशैलीमुळे आणि विविध आरोग्यच्या समस्यांमुळे वंधत्व ही मोठी समस्या होत चालली आहे. 

वंध्यत्वाचे निदान करताना  स्त्रीरोगतज्ञ त्या जोडप्याशी संवाद करता, ज्यामधून स्त्री व पुरुष यांच्यापैकी विविध तपासण्यांद्वारे वंध्यत्वाची करणे शोधली जातात. स्त्रियांमध्ये महत्वाची मासिक पाळी व स्त्रियांची  हिस्ट्री यांची विचारणा केली जाते. रक्ताच्या तपासणीद्वारे स्त्रियांची प्रजननशमता व संप्रेरक (हार्मोन्स) यांची तपासणी केली जाते. तसेच hysterosalpingography द्वारे गर्भनलिका उघडी आहे कि नाही तपासले जाते.गर्भशयातील अंतर्गत अस्तराची तपासणी हिस्ट्रोस्कोपीद्वारे केली जाते आणि बीजाशयच्या गाठी व गर्भाशयच्या गाठी लॅप्रोस्कोपीद्वारे निदान करून उपचार केले जातात. 
पुरुशनची तपासणी करताना सोनोग्राफी हार्मोन्स साठी रक्ताची तपासणी व विर्या साठी तपासणी केली जाते. विविध तपासण्यांद्वारे वंध्यत्वाचे निदान झाल्यावर त्यानुसार चिकित्सापद्धती ठरवता येतात. टेस्टट्यूब बेबी सेंटरला जाणे म्हणजे टेस्टट्यूब बेबीच करावं लागेल असं नव्हे. टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ला जाऊन वंध्यत्वाचे अचूक निदान करणे, त्यासाठी लागणाऱ्या काही स्पेशल टेस्ट करून घेणं खूप म्हणत्वचे असते. वंध्यत्वाची करणे अनेक असू शकतात, परंतु अचूक कारण शोधणे एकाद्या डॉक्टरचे किंवा सेंटरचे नैपुण्य असते, बऱ्याच वेळा प्राथमिक गोळ्या, औषधें , टेस्टने गर्भधारणा राहू शकते. तिची ट्रीटमेंट खर्चिक नसते  .
काही वेळेला चुकीचा सल्ला व जाहिराती यांच्या मुळे वेळ व पैसा जास्त खर्च होतात. कधी-कधी नैसर्गिकरित्या गर्भधारणा न झाल्यास IUI (इंट्रा युटेराइन इनसेमिनेशन) आणि IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी, हे पर्याय उपयुक्त ठरतात.
 

IVF आणि IUI बद्दल जाणून घेणे 
IVF हे आर्टीफिसिअल रेप्रोडुक्टिव्ह टेकनॉलॉगी असून, हे दुसरी स्टेप आहे. IUI खर्चिक नसून सर्वच सायकल सहा ते आठ हजारात होतात, एक सायकलेमध्ये गर्भदारणेची शक्यता २० ते २५ टक्के असते. यात पुरुषनचे शुक्राणू कमी असल्यास किंवा चपळता कमी असल्यास गर्भधारणेची शक्यता राहते. यात वीर्य घेऊन लॅबमध्ये प्रोसेस करून त्यातील खराब शुक्राणू , अनवॉन्टेड सेल्स व चेमिकॅल सस्पेक्टस वेगळे केले जाते व चांगले  शुक्राणू घेऊन त्याला मिडिपा नावाच्या टॉनिक देऊन त्याची प्रत वाढवली जाते. त्याच्यात गर्भधारणा राहण्याची शक्यता तीनपटीने वाढते.
टेस्ट ट्यूब बेबी बद्दल सोप्या भाषेत सांगावे तर या प्रक्रियेत स्त्रीला तिच्या पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून इंजेकशन सुरु केले जातात. नैसर्गिक पाळीत बीजांडा कोषामध्ये एकाच बीज तयार होते. या इंजेकशन मुले अनेक बीज तयार होतात. साधारण ८ ते १५ अंडी तयार होतात. मग अंडी परिपक्व झाल्यास त्याची साइज २ सेंटीमीटर झाल्यावर त्याला परिपक्व करण्यासाठी इंजेकशन दिले जाते. ते इंजेकशन दिल्यानंतर ते परिपक्व होऊन ३६ तासाने फुटू शकतात. असे होऊ न देता ३४ किंवा ३५ तासात त्या स्त्री ला भूल देऊन शस्त्रक्रिया करून सोनोग्राफी च्या देखरेखीखाली अंडी शरीराबाहेर काढली जातात. ती अंडी लॅबमध्ये घेऊन प्रोसेसकरून वर्गवारी केली जाते. मग त्याच वेळेला पुरुषाचे वीर्य देण्यास मागवतात आणि त्यातील चांगले शुक्राणू घेऊन इक्सी (ICSI) द्वारे इनक्यूबेटरमध्ये ठेऊन फेर्टीलाझशन केले जाते व पुन्हा ते स्त्रीबीज इनक्यूबेटरमध्ये ठेवले जाते. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी गर्भ तयार झाले काय, ते पहिले जाते. चांगल्या प्रतीचे गर्भ घेऊन गर्भपिशवीत सोडले जातात, ही प्रक्रिया स्किलफुल टेस्ट ट्यूब बेबी मध्ये महत्वाचा टप्पा आहे. जागतिक स्तरावर या प्रक्रियेचा सक्सेस रेट ५० ते ६० टाक्यांच्या वर मुळीच नाही, जर कुणी ८० ते ९० टक्के असा दावा करत असेल तर तो खोटा आहे. याहीपलीकडे जाऊन काही स्त्रियांमध्ये स्त्रीबीजाची संख्या कमी असेल किंवा  खालावलेली असेल त्या वेळेला वैधानिक नियमानुसार दात्याकडून बीज घेऊ शकतो, तसेच पुरुषनमध्ये देखील शुक्राणू दात्याकडून घेण्याविषयी जोडप्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जातो.  


- डॉ. उमेश मराठे,
(लॅप्रोस्कोपी सर्जन व वंध्यत्व तज्ञ)